"शाळेबाहेरची शाळा" उपक्रमांतर्गत रोहिदासतांडाच्या अंगणवाडीतील कु.गौरी चव्हाण हिची 16 रोजी नागपूर आकाशवाणीवर मुलाखत - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, May 7, 2022

"शाळेबाहेरची शाळा" उपक्रमांतर्गत रोहिदासतांडाच्या अंगणवाडीतील कु.गौरी चव्हाण हिची 16 रोजी नागपूर आकाशवाणीवर मुलाखत

 


किनवट : तालुक्यातील कमठाला केंद्रातील रोहिदासतांडा येथील अंगणवाडीत शिकणारी व इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशपात्र कु.गौरी दिलीप चव्हाण हिच्या मुलाखतीचे प्रसारण नागपूर आकाशवाणीवरून ता.16 मे 2022 रोजी सकाळी 10.35 वाजता  होणार आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्वांनी ही मुलाखत ऐकावी , असे आवाहन गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी केले आहे.

          ता. 5 मे रोजी दुपारी 4.०० वा. शाळेबाहेरची शाळा उपक्रमांतर्गत नागपूर आकाशवाणीवर कु. गौरी दिलीप चव्हाण हीची मुलाखत घेण्यात आली. मुलाखती वेळी गौरी सोबत तिचे मामा बंडूसिंग राठोड व शिक्षिका शालिनी सेलुकर उपस्थित होत्या. गौरीचे वडील शेतकरी आहेत तिची मातृभाषा बंजारी (गोरमाटी) आहे.

          या मुलाखतीचे प्रसारण नागपूर आकाशवाणीवरून विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या प्रेरणेने व प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर आणि प्रथम फाऊंडेशन यांच्या विद्यमाने होत आहे. मुलांनी स्वयंअध्ययन करावे या उद्देशाने 'शाळेबाहेरची शाळा' हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कृतीयुक्त उपक्रम आहे. यातील 300 व्या भागासाठी सदरील मुलाखतीचे ध्वनीमुद्रण करण्यात आले . शरीराच्या विविध अवयवांचा उपयोग कशा कशासाठी होतो . या विषयाला अनुसरून ही मुलाखत घेण्यात आली. ता.16 मे 2022 रोजी सकाळी 10.35 वाजता मुलाखतीचे प्रसारण नागपूर आकाशवाणीवरून होणार आहे.

            गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, बाल विकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरूड,शिक्षणविस्तार अधिकारी मनिषा बडगिरे, डायटचे तालुकासंपर्क अधिकारी अभय परिहार, केंद्रप्रमुख शरद कुरूंदकर, रोहिदासतांडा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नामदेव चव्हाण, प्रथम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक शे. मसुदुद्दिन, जि.प.प्राथमिक शाळा रहिवास तांडाचे मुख्याध्यापक प्रशांत शेरे तसेच अंगणवाडी सेविका कविता चव्हाण यांनी कु.गौरी चव्हाण हिचे मुलाखतीबद्दल कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News