किनवट पंचायत समितीत स्वराज्य गुढी उभारून शिवस्वराज दिन उत्साहात साजरा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Monday, June 6, 2022

किनवट पंचायत समितीत स्वराज्य गुढी उभारून शिवस्वराज दिन उत्साहात साजरा

 


 

किनवट : पंचायत समितीच्या प्रांगणात आज शिवस्वराज दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक सुभाष धनवे व मान्यवरांच्या हस्ते भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून अभिवादन करण्यात आले. 

       पंचायत समिती माजी सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. एन. आडपोड, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, बाल विकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड, लेखाधिकारी सुनिल नेम्माणीवार यांच्यासह पंचायत समितीचे खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

         "छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणा स्त्रोत आहेत. आई जीजाऊच्या मार्गदर्शनाखाली बालपणापासूनच त्यांनी शौर्याचे धडे गिरवत स्वराज्याचे तोरण बांधले. हे राज्य सुखी व्हावे, हे राज्य रयतेचे व्हावे यासाठी त्यांनी आजच्या दिवशी म्हणजे 6 जून 1674 रोजी स्वराज्याचे तोरण बांधले. एका समृध्द्व नितीचा, जनकल्याणाचा वारसा त्यांनी आपल्याला दिला आहे. हा वारसा प्रत्येक ग्रामपंचायती मार्फत, पंचायत समिती मार्फत, जिल्हा परिषदेमार्फत आपण आज सर्वांपर्यत अप्रत्यक्षरित्या पोहचवित आहोत. या दिनापासून आपण सर्वजण प्रेरणा घेवूया"  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या ह्या शुभेच्छा संदेशाला तळागाळापर्यंत पोहचविण्याचा यावेळी सर्वांनी निर्धार केला.               याप्रसंगी शिक्षक कलावंत सुरेश पाटील यांनी राहूल तामगाडगे यांच्या ऑक्टोपॅड साथीने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश मॅकलवार, राम बुसमवार आदिंनी परिश्रम घेतले.

 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News