प्रेम उठाव हे कवी संमेलन एक अनोखे कवी संमेलन म्हणून यादगारच राहणार ! -नवनाथ रणखांबे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, June 7, 2022

प्रेम उठाव हे कवी संमेलन एक अनोखे कवी संमेलन म्हणून यादगारच राहणार ! -नवनाथ रणखांबे

 



मुंबई/ ठाणे : हृदय आणि जग प्रेमानेच जिंकता येते. त्यामुळे प्रेम उठाव हे कवी संमेलन एक अनोखे असे वेगळे कवी संमेलन म्हणून यादगारच राहणार आहे. असे प्रतिपादन साहित्यिक नवनाथ रणखांबे यांनी केले.

      नवनाथ रणखांबे यांच्या  "प्रेम उठाव "  पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या  निमित्ताने   कवी कट्टा ग्रुप कल्याण मुंबईच्या वतीने आयोजित केलेल्या प्रेम उठाव कवी संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाहीर मास्टर राजरत्न राजगुरु, गजलकर कवी विजयकुमार भोईर, कवी कांतीलाल भडांगे, कवयित्री मनीषा मेश्राम विचारपीठावर उपस्थित होते. 

       पुढे बोलतांना रणखांबे असे म्हणाले की , दुःख पाहून , दुःख सोसून  कलावंत अस्वस्थ होत असतो. कलावंत हा दुःखाच्या वेदना सोसून निर्माण होतो. वेदनेच्या कळा सहन करून कलावंत आपली कला-साहित्य निर्माण करतो.  कविता लिहणे सोपे काम नाही. दुःखाचा समुद्र डोळ्यात दाटल्यावर  टपटपतात टपोरे थेंब कविता होऊन कागदावर ! कविता अशी निर्माण होते. प्रेम उठाव कविसंमेलनाचा विषय प्रेमावरील कविता हाच आहे. मुळात प्रेम म्हणजे  तिच्या आणि त्याच्या प्रेमाच्या कविता नसून प्रेमाचे विविध पदर आहेत. त्यात दुःख , अबोला ,विरह मिलन इ. येते.  त्यात तो आणि ती यांचे प्रेम, कौटुंबिक  प्रेम, समाजाप्रती प्रेम, देशाप्रती प्रेम,  महामानवा विषयी प्रेम असे प्रेम विविध प्रकारचे आहे. त्याला विविध पदर आहेत. 

        हे   कवी कविसंमेलन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेल्या   कवीं आणि कवयित्री यांनी कवी संमेलनात  सहभाग घेतला होता.  सर्वांना कवी कट्टा ग्रुप  कल्याण  मुंबई यांच्याकडून  सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले . 

 


    कवी नवनाथ रणखांबे, कवी विजयकुमार भोईर, मास्टर राजरत्न राजगुरु, कांतीलाल भडांगे,  मनिषा मेश्राम, अनिल शिंदे, जगदेव भटू, ऍड. प्रज्ञेश सोनावणे, मिलिंद जाधव , शाम बैसाने, अमर नवघरे, विनोद गायकवाड,  नरेश जाधव, संघरत्न घनघाव,  अक्षय भोईर, प्रकाश दत्तू म्होळे, दीपक आंबटकर, शरद डोहके,  रोहित जाधव, विनोद गायकवाड, प्रणिता खांबे, संतोष शीरवाल, शैलेश निवाते,  विनोद घाणेकर, प्रकाश मोहले, प्रवीण खोलंबे,  दीपक आंबटकर, शरद टोहके, संदीप कांबळे, मारुती कांबळे  ,  सुरेखा गायकवाड, कामिनी धनगर, नरेश अहिरे आदी  महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेल्या पन्नास  कवी-कवयित्री यांनी सहभाग घेतला . कविसंमेलनात  सर्व कवींनी  प्रेमा वरील कवितेच्या सादरीकरणाने प्रेमाचा पाऊस पाडला आहे.  रसिकांनी प्रेमावरील कवितांचा आनंद घेतला .

        यावेळी कवी कट्टा ग्रुप कल्याण मुंबई तर्फे जीवन गौरव पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार, साहित्य सेवा पुरस्कार आणि उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2021-2022 विविध 32 मान्यवरांना देण्यात आला.     सूत्रसंचालन कवी मिलिंद जाधव यांनी केले तर  कवी संमेलनाचे सुत्रसंचालन कवी संघरत्न घनघाव, सुरेखा गायकवाड  यांनी केले तर आभार अनिल शिंदे यांनी मानले .


 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News