गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांनी पहिले पाऊल उपक्रमात केला नवागतांचा व शिक्षकांचा गौरव - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, June 16, 2022

गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांनी पहिले पाऊल उपक्रमात केला नवागतांचा व शिक्षकांचा गौरव

 



किनवट  : तालुक्यातील कमठाला केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशपूर (नवे ) व  गणेशपूर येथे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तथा प्रशासक सुभाष धनवे यांनी भेट देऊन पहिले पाऊल उपक्रमांतर्गत शाळेत पहिलं पाऊल टाकणाऱ्या पहिलीत प्रवेशित मुलांचा व शिक्षकांचा पुष्प देऊन गौरव केला आणि त्यांच्याशी संवाद साधला.

        जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर- घुगे यांनी शाळारंभ निमित्त "पहिले पाऊले उपक्रमांतर्गत" शाळेत पहिलं पाऊल टाकणाऱ्या मुलांच्या पावलाचे ठसे घेऊन गौरव करण्यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळेत भेट द्यावी असे सूचित केले होते. यानुषंगाने गटविकास अधिकारी तथा प्रशासक सुभाष धनवे व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजय मुरमुरे यांनी गणेशपूर शाळेस भेट दिली. यावेळी केंद्र प्रमुख विजय मडावी व आरोग्य विभागाचे भुरे उपस्थित होते. गट विकास अधिकाऱ्यांनी शालेय कामकाजाचा आढावा घेतला. परिसर पाहणी केली. शालेय सफाई व पहिल्या दिवशीच्या तयारी बद्दल समाधान व्यक्त केले.

        याप्रसंगी गणेशपूर (नवे) शाळेचे मुख्याध्यापक देविदास वंजारे, सह शिक्षिका प्रेमिला जाधव , गणेशपूर शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार जाधव व सहकारी शिक्षक राजेश मोरताडे  यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करून गटविकास अधिकारी धनवे व आरोग्य अधिकारी डॉ. मुरमुरे यांनी पुष्पगुच्छ देवून गौरव केला.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News