आदिवासी गिरिजन क्षेत्रासाठीच्या सांस्कृतिक पुरस्कारासाठी निवडीबद्दल मोहन मेश्राम यांचा आ. केराम यांनी केला गौरव - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, June 18, 2022

आदिवासी गिरिजन क्षेत्रासाठीच्या सांस्कृतिक पुरस्कारासाठी निवडीबद्दल मोहन मेश्राम यांचा आ. केराम यांनी केला गौरव

 




किनवट :  माहूर तालुक्यातील गोंडवाडी येथील मोहन मेश्राम यांची राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्याच्या आदिवासी गिरिजन क्षेत्रासाठीच्या पुरस्कारासाठी निवड जाहीर झाल्या बद्दल आमदार भीमराव केराम यांनी शनिवार (ता. १८ ) रोजी आपल्या निवासस्थानी त्यांचा गौरव  केला.

           राज्य सरकारच्या वतीने सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंताना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येते.(सन २०१९-२०) यावर्षीच्या आदिवासी गिरिजन क्षेत्रासाठीच्या पुरस्कारासाठी किनवट- माहूर विधानसभा मतदार संघातील आदिवासी बहूल अत्यंत दुर्गम भाग असलेल्या माहूर तालुक्यातील मौजे गोंडवाडी येथील मोहन मेश्राम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभुमिवर शनिवार (ता. १८ ) आमदार भीमरावजी केराम यांनी आपल्या राजगृह निवासस्थानी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सन्मान केला. तसेच त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे यांच्यासह युवानेते ऍड. प्रतीक केराम, स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते, अनिल तिरमनवार, उमाकांत क-हाळे यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News