नाहीरे वर्गाच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेणाऱ्या बालासाहेब लोणे व परिवाराचा दातृत्वाचा आदर्श घेवून वंचितांना मदत करावी -जि. प. माजी सभापती संजय देशमुख, लहानकर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, June 18, 2022

नाहीरे वर्गाच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेणाऱ्या बालासाहेब लोणे व परिवाराचा दातृत्वाचा आदर्श घेवून वंचितांना मदत करावी -जि. प. माजी सभापती संजय देशमुख, लहानकर

 



हदगांव (नांदेड ) : समाजात आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विषमतेची दरी निर्माण होवू नये यासाठी आहेरे वर्गांनी नाहीरे वर्गाच्या मदतीसाठी सदैव मदतीचा हात पुढे करायला हवा. जेणे करुन वंचित व मागास समाज घटक सर्वांसोबत प्रगती साधू शकतील, या कामी सदैव पुढाकार घेणाऱ्या बालासाहेब लोणे व परिवाराचा सततच्या दातृत्वाचा आदर्श आहेरे वर्गानी घ्यावा.असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर यांनी केले.

         बालासाहेब लोणे, लहानकर परिवाराच्यावतीने बालासाहेब लोणे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील जि.प.प्रा.शा. चाभरा शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे लाँग रजिस्टर व लेखन साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हदगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी किशन फोले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन  ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनील पाटील, ग्रामपंचायत चाभरा येथील सरपंच सदाशिव पाटील चाभरकर, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस सुभाष लोणे, लहानकर, महाराष्ट्र राज्य पर्यावरण, प्रदुषण व औद्योगिक नियंत्रण विभागाचे  नागपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद लोणे, लहानकर, ग्रा.पं.लहानचे माजी सरपंच एल.बी.रणखांब,  ग्रा.पं. चाभराचे सदस्य नारायण संगेवार, ग्रां.प.लहानचे ग्रामपंचायत सदस्य आनंद लोणे, विजय सावंत, मिलिंद लोणे, नागेश वाहेवळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन बोले, उपाध्यक्ष आनंदराव मगर, ग्रा.पं.चाभरा माजी उपसरपंच बबनदादा बोले, संतोष कऱ्हाळे, संजय देशमुख, बालाजी गुंजकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.संजय देशमुख, मुख्याध्यापक चंद्रकांत दामेकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी बँक लि. जिल्हा नांदेडच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष,नांदेड जिल्हा परिषद अधिकारी /कर्मचारी जयंती मंडळाचे सचिव, इब्टाचे केंद्रीय नांदेड जिल्हा अध्यक्ष तथा सहकारी शिक्षण पतपेढीचे म.जि.प.नांदेडचे माजी सचिव बालासाहेब लोणे, लहानकर, अनुराग आठवले, बारडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

              यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाभरा शाळेतील २८८ विद्यार्थ्यांना दर्जेदार लाँग रजिस्टर व इतर लेखन साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुअ चंद्रकांत दामेकर यांनी व सुत्रसंचालन राजेश चिटकुलवार यांनी केले. बालासाहेब लोणे यांनी आभार मानले.    

           याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल पाटील, पत्रकार सुभाष लोणे, लहानकर, प्रमोद लोणे, लहानकर यांची समयोचित भाषणे झाली.  यावेळी अध्यक्ष,प्रमुख पाहुणे व ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पर्यावरण, प्रदुषण व औद्योगिक नियंत्रण विभागाचे  नागपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद लोणे, लहानकर यांनी बालासाहेब लोणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा घेवून बक्षिस वितरणासाठी जि.प.प्रा.शा.चाभरा शाळेला ५ हजार रुपयाचे दान दिले.


        अध्यक्षीय समारोप करताना हदगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी किशन फोले म्हणाले की, शाळेतूनच देशाचे भवितव्य घडत असल्यामुळे,समाजातील प्रत्येक दानशूर व्यक्तिने शाळेच्या भौतिक सेवासुविधा पुरविण्यासाठी शाळेसोबत समाज विकासासाठी पुढे यायला हवेच. गावागावात छत्रपती शिवाजी महाराज, म.फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी करायला हवी. बालासाहेब लोणे व परिवाराशी माझे फार जूने व परिवर्तनवादी चळवळीचे नाते आहे. या परिवाराने आज १००% विद्यार्थ्यांना  शैक्षणिक साहित्य वाटपाचा स्तूत्य उपक्रम घेतला. तसेच ते दरवर्षी अनेक आदिवासी वाड्या-पाड्यात शैक्षणिक साहित्य वाटप करतात. विविध समाज घटकातील २० विद्यार्थी दत्तक घेवून त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च ते उचलतात. मागील कोरोना काळात या परिवाराने ५०० कुटुंबांना एक महिनाभर पुरेल इतके संपूर्ण धान्यादी मालाचे वाटप नांदेड मनपाचे आयुक्त डॉ.सुनील लहाने यांच्या हस्ते केलेले आहे. मागील सर्व प्रेरणा व विचार बहुजन व परिवर्तनवादी चळवळचे नेते आमचे मित्र बालासाहेब लोणे यांची असते याचा आम्हाला सार्थ अभिमान गर्व आहे. एकजीव व एकरुप असणाऱ्या लोणे,लहानकर परिवाराचे शिक्षण विभागाच्यावतीने अभिनंदन करतो. असे गौरोद्गार त्यांनी काढले.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जि.प.प्रा.शाळा चाभरा केंद्र निमगाव ता. हदगाव शाळेतील शिक्षक बळीराम कदम, अशोक फुलवळकर, विनायक मुलंगे, पांडुरंग चव्हाण, सुनिल कंठाळे, राजेश चिटकुलवार, प्रतिभा बस्सापूरे, विजया पिन्नलवार, रंजिता भिसे यांनी विशेष परिश्रम घेतले.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News