दरवर्षी जिल्ह्यातून ५०० लाेककलावंतानां अनूदान द्यावे -आ.माधवराव पाटील जवळगावकर #पाेटा येथे लाेककलावंत मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 27, 2022

दरवर्षी जिल्ह्यातून ५०० लाेककलावंतानां अनूदान द्यावे -आ.माधवराव पाटील जवळगावकर #पाेटा येथे लाेककलावंत मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

 

हिमायतनगर : तालुक्यातील पोटा येथे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे हस्ते गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार स्विकारताना दक्षिणात्य सिने सृष्टीचे दिग्दर्शक, निर्माता, नृत्यगुरू तथा अभिनेता एस.व्ही रमणराव


हिमायतनगर (नांदेड ) :  भौगाेलिक आकार व जिल्ह्याची लाेकसंख्या यावर आधारीत लाेककलावंताना मानधन देण्याचे उद्दिष्ट ठरवून दरवर्षी नांदेड जिल्ह्यासाठी ५०० लाेककलावंताना मानधन देण्याची शिफारस करून संधी द्यावी असे प्रतिपादन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.
             स्मृतिशेष गुरूवर्य एम. पी.भवरे कामारीकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्यावतीने
पाेटा ता.हिमायतनगर येथे बहुजन टायगर्स फाेर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांनी आयाेजित केलेल्या लाेककलावंत  मेळावा आणि आदर्श समाजसेवक,पदाधिकारी,अधिकारी , शिक्षक, सिनेकलाकार हास्यकलाकार लाेककलावंत यांना पुरस्कार वितरण प्रसंगी  अध्यक्षीय समारोप करतांना बोलत ते बोलत होते.   
         जिल्ह्याच्या ग्रामीण  भागात  लाेककलेवर आपलं दैनंदिन जीवन  भागवणारे कलावंत अडचणीचा सामना करत असतात. त्यांचे प्रश्न साेडविण्यासाठी स्थानिक पदाधिकारी शासनाचे अधिकारी समाजसेवक यांनी प्रयत्न करावे. वंचित लाेककलावंताच्या समस्या साेडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे आमदार माधवराव पाटील म्हणाले.
         प्रारंभी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. एस.जी.माळाेदे यांनी लाेककलावंत मेळाव्याचे उद्घाटन केले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एच.एडके यांनी मार्गदर्शन केले. स्वागताध्यक्ष बालाजी राठाेड यांनी स्वागतपर भाषण  केले. प्रास्ताविकात अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांनी लाेककलावंत मेळावे पुरस्कार वितरण सन २००३ सालापासून केले जात असल्याचे  सांगितले. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.  लक्ष्मण भवरे यांनी आभार मानले.

हिमायतनगर : तालुक्यातील पोटा येथे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे हस्ते गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार स्विकारताना जिल्हा परिषद स्वच्छता विभागाचे कार्यक्रम अधिकारी मिलिंद व्यवहारे
       

            याप्रसंगी दक्षिणात्य सिने सृष्टीचे दिग्दर्शक, निर्माता, नृत्यगुरू तथा अभिनेता एस.व्ही रमणराव, हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे, पत्रकार तथा निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे  स्वियसहाय्यक बालाजी नागमवाड (सेवा गौरव), समाजसेविका श्रीमती विजया काचावार (सेवा गौरव), विस्तार अधिकारी प.स.लोहा डि. आय. गायकवाड (सेवा गौरव), समाज कल्याण निरिक्षक श्रीमती एस.जी.वागतकर (सेवा गौरव), जिल्हा परिषद स्वच्छता विभागाचे कार्यक्रम अधिकारी मिलिंद व्यवहारे (सेवा गौरव) , समतादूत दिलिप सोंडारे (सेवा गौरव) , समाज सुधारक कैलास गायकवाड (सेवा गौरव), वनाधिकारी श्रीकांत जाधव (कर्तव्यदक्ष अधिकारी) , वनाधिकारी अनिल रासने (कर्तव्यदक्ष अधिकारी), सपोनि बी.जी.महाजन (कर्तव्यदक्ष अधिकारी), वनाधिकारी एस.डी.हराळ (कर्तव्यदक्ष अधिकारी), कृषी अधिकारी पुंडलिक माने (कर्तव्यदक्ष अधिकारी), मुख्याध्यापक सरसम गजानन सुर्यवंशी (आदर्श मुख्याध्यापक), सहशिक्षक समाधान सुर्वे (आदर्श शिक्षक), वनपाल अण्णासाहेब वडजे (सेवा गौरव) , सहशिक्षक गोपाल तुमल्लवार (आदर्श शिक्षक), वनपाल अमोल कदम (सेवा गौरव) ह्या मान्यवरांना आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्याहस्ते गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर स्मृती  राज्यस्तरीय पुरस्कारांने  गौरविण्यात आले.
     

हिमायतनगर : तालुक्यातील पोटा येथे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे हस्ते गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार स्विकारताना अशोक माध्यमिक विद्यालय पळशी येथील शिक्षक गोपाल तुम्मलवार
     

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागोराव मेडेवाड, शिवाजी डोखळे, नागनाथ वच्छेवाड, परमेश्वर वालेगावकर, केशव माने, प्रकाश कदम, जळबा जळपते, संभाजी गाडगे, शेषराव  चव्हाण, तुकाराम भिसे,विष्णु वानोळै, किशनराव ठमके, शंकर गायकवाड, गौरथनाथ मस्तके, अविनाश कदम, प्रकाश गुडेकर, सुभाष गुडेकर,शेखाखयुम, जगन्नाथ नरवाडे, यशवंत थोरात, किरण वाघमारे, बसवंता कांबळे, सुरेखा डोखळे, लक्ष्मीबाई परमेश्वर वालेगावकर, लक्ष्मीबाई मिराशे, श्याम खिराडे, उत्तम भगत आदींनी विशेष परिश्रम
घेतले.

हिमायतनगर : तालुक्यातील पोटा येथे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे हस्ते गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार स्विकारताना पत्रकार तथा निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे
           

           यावेळी निमंत्रक कैलास माने, दताभाऊ पवार तर स्वागताध्यक्ष रफिक भाई शेख हिमायतनगरकर ,ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, साहित्यिक डॉ,मारोती वाघमारे, पत्रकार कानबा पोपलवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक गणपत नरवाडे कामारीकर, कार्यकारी अभियंता अशोक भोजराज, अभियंता संजय मेकेवार, डॉ विलास ढवळे, सेवानिवृत्त उप विभागीय अभियंता श्रीराज भवरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशीनाथ पोपलवार, ज्येष्ठ शाहीर व्यंकट बैठकबिलोलीकर, के. डी. बेबरे पाटील, बळीराम जाधव सुजलेगावकर, बापुराव जमदाडे, शाहीर नरेंद्र दोराटे, साहेबराव  वाढवे,  राठोड, अभियंता इंदुरकर, पत्रकार वाठोरे, पत्रकार गायकवाड यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमास  तेलंगणा, विदर्भ मराठवाड्यातील  कलावंत मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News