कारभारी दमानं , जाहीर झालं आरक्षणं - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 27, 2022

कारभारी दमानं , जाहीर झालं आरक्षणं

 



भोकर (नांदेड) : तालुक्यातील १० गावचे सरपंच पद जानेवारी २०२१ पासून अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार सदस्य मिळत नसल्याने रिक्त होते. येथील कारभार उपसरपंचच हाकत होते. पण बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव डॉ. कैलास कानिंदे रेणापूरकर यांच्या मागणीची दखल घेऊन आज तारीख २७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रभारी उपविभागीय अधिकारी , प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार  राजेश लांडगे यांनी सर्व कायद्याचा अभ्यास करून व जिल्हाधिकारी यांचे आदेश ग्राह्य धरुन  पुढील उर्वरित काळासाठी सरपंच पदासाठी नवीन आरक्षण जाहीर केले. कारभारी दमानं , आता जाहीर झालं आरक्षणं. असे म्हणत नागरिक आपल्या गावच्या पुढाऱ्याला गोंजारत आहेत.

      सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे : रेणापुर-अनुसूचित जाती, जाकापूर-अनुसूचित जाती, धारजणी- अनुसूचित जाती, धावरी खू.- अनुसूचित जाती, रावणगाव- अनुसूचित जाती महिला, दिवशी खू.- अनुसूचित जाती महिला, हस्सापूर- अनुसूचित जाती महिला, सायाळ- अनुसूचित जाती महिला, कोळगाव खू.- अनुसूचित जाती महिला व बटाळा/ किन्हाळा- अनुसूचित जाती महिला. असे आरक्षण जाहीर करण्यात आले. आता गावाला हक्काचा सरपंच मिळणार असून गावाच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा गावातील नागरिकांमधून व्यक्त होताना दिसून येत आहे.
      या आरक्षण सोडतीच्या बैठकीला गटविकास अधिकारी अमित राठोड, निवडणूक विभागाचे कर्मचारी व अनेक गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News