अभि. भरतकुमार कानिंदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, January 11, 2023

अभि. भरतकुमार कानिंदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत

 



किनवट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, नांदेडच्या वतीने हिमायतनगर तालुक्यातील सोनारीफाटा येथे आयोजित सहाव्या बौद्ध धम्म परिषदेत बानाईचे कार्यकर्ते सेवानिवत्त सहायक अभियंता भरतकुमार कानिंदे यांना राष्ट्रीय प्रबोधनकार सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज व मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे 

         यावेळी धम्म परिषदेचे अध्यक्ष किशोर भवरे,  उद्घाटक पंजाब पाटील कोहळीकर, परिषदेचे संयोजक त्रिरत्नकुमार भवरे, स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे, निमंत्रक बालाजी राठोड, जोगेंद्र नरवाडे, कैलास माने, डॉ. मनोज राऊत, लक्ष्मणराव भवरे, जयभीम पाटील, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे , पत्रकार एल.ए. हिरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

         अभियंता भरतकुमार कानिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात सेवा बजावितांना लोकप्रशासन आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुन समाजात नाव उज्वल केले आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इजिनिअर्स (बानाई) चे कार्यकर्ते म्हणून अनेक वंचित , उपेक्षित , श्रमिक कार्यकर्ते , कलावंत ,विद्यार्थी यांना त्यांनी स्वबळावर उभे राहण्याची प्रेरणा दिली. मोफत ग्रंथदान केले. या प्रभावी कामगिरीच्या गौरोवार्थ त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

          या सन्मानाबद्दल अभि. यशवंत गच्चे, पत्रकार बाबूराव पाटील, माजी नगरसेवक मनोज गीमेकर, पत्रकार जयभीम पाटील, अनंत मुनेश्वर, अप्पाराव येरेकार, उत्तम मुनेश्वर, मिलिंद गायकवाड, सूरेश कावळे, देविदास मुनेश्वर, एस. के. पंडित, साहेबराव पुंडगे, बी. जी. पवार, प्रल्हाद मुनेश्वर,भगवान येरेकार, डॉ. कैलास कानिंदे रेणापुरकर, मनोज शिंदे, ईश्वर सावंत, भीमराव शिंगाडे, भीमराव धनजकर, एम. एम. कांबळे, वसंत वीर, अशोक गायकवाड, दिपक बनसोडे, टी. पी. वाघमारे, आर.सी.कांबळे, उत्तम कानिंदे, दयानंद तारू, मिलींद कदम, अभि. सम्राट हटकर आदींनी त्यांचे कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News