'धरनी आईची माया...'ने प्रथम व 'बोलो तारा रारा...' ने उत्तेजनार्थ बक्षिस पटकावून सिंदगीतांडा शाळेने स्पर्धेत मारली बाजी ; तर मोहपूरच्या ' रे रे ना रेना ना रे...' या ढेमसा आदिवासी नृत्याने सर्वांना ठेका धरायला केलं राजी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, February 10, 2023

'धरनी आईची माया...'ने प्रथम व 'बोलो तारा रारा...' ने उत्तेजनार्थ बक्षिस पटकावून सिंदगीतांडा शाळेने स्पर्धेत मारली बाजी ; तर मोहपूरच्या ' रे रे ना रेना ना रे...' या ढेमसा आदिवासी नृत्याने सर्वांना ठेका धरायला केलं राजी



किनवट : ...'धरनी आईची माया...' या गीतने लहान गटातून प्रथम व 'बोलो तारारारा...' या भांगडा नृत्याने मोठ्या गटातून उत्तेजनार्थ बक्षिस पटकावून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगीतांडाने बाजी मारली ; तर मोठ्या गटातून ' रे रे ना रेना रे ना... ' या आदिवासी ढेमसा नृत्याने जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा मोहपूरने प्रथम क्रमांक मिळवून सर्व रसिकांना ठेका धराय लावला. 

              चिमुकल्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी तालुक्यातील अतिदुर्गम सिंदगी (मोहपूर ) गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने ' केंद्रस्तरीय सांस्कृतिक कला स्पर्धा महोत्सव ' आयोजित करण्यात आला होता. 

            यावेळी उद्घाटक म्हणून गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने व प्रमुख अतिथी म्हणून  माजी पं.स.सदस्य प्रेमसिंग नाईक , सरपंच तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष परमेश्वर खोकले, उपसरपंच दत्ता चिकने, विस्तार अधिकारी ( शिक्षण) मनीषा बडगिरे, केंद्र प्रमुख पद्माकर कवटीकवार, भाजपा तालुकाउपाध्यक्ष बबन वानखेडे , ग्राम पंचायत सदस्य रूपेश पाटील, पोलीस पाटील बालाजी वानखेडे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष राहूल उमरे, सदस्य सुरेश वानखेडे, केंद्रिय मुख्याध्यापक राजेश्वर जोशी उपस्थित होते.

         रमेश खुपसे, शरद कुरूंदकर व चंद्रशेखर सर्पे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

          या स्पर्धेत मोहपूर केंद्रातील चार शाळेने लहान गटात ( इयत्ता 1 ली ते 4 थी ) तर दोन शाळेने मोठ्या गटात ( इयत्ता 5 वी ते 8 वी ) विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमातून प्रत्येक शाळने एकापेक्षा एक सरस नृत्य आविष्कार प्रेक्षकांसमोर सादर केले. यात विविध हिंदी, मराठी गीते , शेतकरी, वारकरी, रीमिक्स, आदिवासी ढेमसा नृत्य, अश्या नाविन्यपूर्ण नृत्य गीतांनी रसिकांची मने जिंकली.

        या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे : मोठा गट : प्रथम : ' रे रे ना रेना रे ना... ' या आदिवासी ढेमसा नृत्य (जि.प. कें.प्रा. शाळा मोहपूर ) व  उत्तेजनार्थ : 'बोलो तारारारा...'  भांगडा (जि.प.उ. प्रा. शाळा सिंदगीतांडा ), लहान गट : प्रथम : ...'धरनी आईची माया...' (जि.प.उ. प्रा. शाळा सिंदगीतांडा), द्वितीय :' सामी सामी ( जि.प. प्रा. शा. सिंदगीगाव) , तृतीय : 'झुजू मुंजू झालं' (जि.प. कें. प्रा.शा. मोहपूर ) व उत्तेजनार्थ : ' माऊली माऊली... ' (जि.प. प्रा.शा. पांधरा )


       उत्कर्षा कांबळे हिने ' मेरा भीम नंबर वन' गीतावर अप्रतिम नृत्य केले. तसेच आंजी येथील चिमुकल्यांनी सादर केलेल्या ' झुमकावाली पोर ' व 'सरकार... ' या भन्नाट नृत्यास बक्षिसांचा वर्षाव करून रसिकांनी डोक्यावर घेतले.

                  कार्यक्रमास  शेख इब्राहिम, प्रदिप पवार, रुपेश मुनेश्वर, गणपत किनाके , सुभाष सोनटक्के , वासुदेव राजूरकर, राहूल तामगाडगे, गड्डमवाड, रविंद्र चौधरी , कांबळे , संगीता भवरे , नागसेन पाटील आदींसह  सिंदगी( मो ) आणि मोहपूर केंद्र अंतर्गत बेल्लोरी (ज ), पांधरा , आंजी, मोहपूर खेडी गावासह परिसरातून हजारो प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली होती. आयोजक सिंदगी गावचे मुख्याध्यापक सदानंद अचकुलवार यांनी प्रास्ताविक , रामेश्वर डुडूळे व नितिन बैस यांनी सूत्रसंचालन  केले.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक कुडमेते, पोटे, सिंदगीगाव व सिंदगीतांडा येथील सर्व तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News