नांदेड : जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पुर परिस्थिती नंतर पूरग्रस्त गावांमध्ये रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये या करीता भोकर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार जयाताई चव्हाण व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, यांच्या सूचनेनुसार मेघना कावली, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या संकल्पनेतून, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .संतोष सूर्यवंशी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीकांत देसाई यांच्या मार्गर्शनानुसार अर्धापूर तालुक्यातील अनेक पूरग्रस्त गावांमध्ये पूरस्थिती पश्चात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
अनेक पूरग्रस्त गावांपैकी मौजे बामणी येथे माननीय आमदार जयाताई चव्हाण , जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत वैद्यकीय पथकांनी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली.
या शिबिरा दरम्यान पूर परिस्थिती नंतर उद्भवणारे विविध आजार व घ्यावयाची प्रतिबंधात्मक काळजी याबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गावातील २०० ते २५० वयोवृद्ध महिला-पुरुष,गरोदर माता व लहान बालकांची वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यक त्या रक्त चाचण्या देखील करण्यात आल्या . जिल्हा आरोग्य यंत्रणेने मोठ्या प्रमाणात औषध गोळ्यांचा पुरवठा केल्यामुळे, गरजूंना जागेवरच औषधोपचार देखील देण्यात आला . पूरस्थितीनंतर नांदेड जिल्ह्यामध्ये व अर्धापूर तालुक्यामध्ये कुठेही, पूरपश्चात साथीचे आजार उद्भवणार नाहीत यासाठी नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण आरोग्य यंत्रणा सक्रियपणे काम करत आहे अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष सूर्यवंशी व अर्धापूर तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई यांनी दिली.
अर्धापूर तालुक्यामधील बामणी, सावरगाव, शेलगाव, जांभरुण, सांगवी इत्यादी गावामध्ये एकाच दिवशी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव व येळेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.श्याम सावंत, डॉ. बाळासाहेब पवार, डॉ.भाग्यश्री कपाटे, डॉ. पल्लवी खंडागळे यांनी रुग्ण तपासणी केली. तर हे शिबिर यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी संबंधित गावांचे सरपंच ,प्रतिष्ठित नागरिक, माजी बांधकाम सभापती श्री संजय लहानकर ,डॉ. एस पी गोखले, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी राजकुमार इंगळे, विलास चाटे, आरोग्य निरीक्षक कल्याणकर, श्री पाटील, श्री अरूण गादगे, रंजना भाले ,सुजाता बोरकर यांनी परिश्रम घेतले.




No comments:
Post a Comment