नांदेड : मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद, नांदेड येथील जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने पूरपश्चात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऑगस्ट २०२५ आणि सप्टेंबर २०२५ मध्ये नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा पूरग्रस्त झाला आहे, ज्यामध्ये काही गावे पाण्याखाली गेली होती आणि जीवितहानी देखील झाली आहे.
शिबिराचा उद्देश व कालावधी
पूर परिस्थितीमुळे आणि पूर ओसरल्यानंतर जलजन्य आणि कीटकजन्य आजार होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना करण्यासाठी गावनिहाय आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
शिबिरांचा कालावधी: दिनांक ०३/१०/२०२५ ते ०७/१०/२०२५ पर्यंत
* आयोजन: तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी (प्रा.आ. केंद्र) यांनी त्यांच्या वैद्यकीय पथकासह आणि औषधी साठ्यासह, सोबत जोडलेल्या पूरबाधित गावनिहाय यादीनुसार नियोजित तारखेला शिबिराचे आयोजन करायचे आहे.
* सेवा: वैद्यकीय पथकांनी शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहून रुग्ण आणि नागरिकांना आरोग्य सेवा द्यावी.
शिबिराचा तपशील.
या शिबिरांमध्ये नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील एकूण ६७ पूरग्रस्त गावांमधील ७१,४६५ नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे नियोजन आहे.
शिबिरात देण्यात आलेल्या सेवांचा सविस्तर अहवाल प्रस्तुत कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या कृती नियोजनामध्ये पूरबाधित गावनिहाय व दिनांकनिहाय कृती योजना समाविष्ट आहे.
प्रशासनाच्या वतीने आवाहन
सर्व पूरबाधित गावातील नागरिकांनी आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी नियोजित तारखेनुसार शिबिरांमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली, भा.प्र.से., यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment