पदाधिकारी व नागरीकांच्या सहकार्यामुळे " स्वस्थ नारी,सशक्त परिवार " अभियान यशस्वी! -डॉ. सगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नादेड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, October 4, 2025

पदाधिकारी व नागरीकांच्या सहकार्यामुळे " स्वस्थ नारी,सशक्त परिवार " अभियान यशस्वी! -डॉ. सगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नादेड

 



नांदेड : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनाने जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी दि. १७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान' (SNSPA Camps) यशस्वीरित्या राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विक्रमी तपासणी करण्यात आली असून नागरिकांचा आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

     या कालावधीतील आरोग्य शिबिरांची आकडेवारी खालीलप्रमाणे (१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५) 


 •  एकूण आयोजित शिबिरे (तपासणी शिबिरे + विशेष शिबिरे) | ७७८१ |

* एकूण उपस्थिती (Footfall) | ५,०७,१०३ (पुरुष: १,६३,५६८, महिला: ३,४३,५५२) |

* एकूण विशेष शिबिरे | ५४४ |

* उच्च रक्तदाब (Hypertension) तपासणी केलेले नागरिक | १,१३,२८१ |

* मधुमेह (Diabetes) तपासणी केलेले नागरिक | १,०१,३२६ |

* कर्करोग (Cancers-Oral, Breast and Cervical) तपासणी केलेले नागरिक | ८१,६०२ |

* ॲनिमिया (Anaemia) तपासणी केलेले नागरिक | ५३,९४९ |

* टीबी (TB) साठी तपासणी केलेले नागरिक | ७७,४२२ |

* Sickle Cell Disease साठी तपासणी केलेले नागरिक | १६,१३५ |

*गरोदर मातांची (ANC) तपासणी | ११,४५४ |

*विविध कार्यक्रमांसाठी समुपदेशन (Counselling) केलेले नागरिक | ३,८६,३४७ |

* पंतप्रधान जन आरोग्य योजना (PM-JAY)/आयुष्मान कार्ड्स वितरित | १४,२०५ |

ठळक नोंदी:

  - या अभियानात उच्च रक्तदाबासाठी एकूण १,१३,२८१ आणि मधुमेहासाठी एकूण १,०१,३२६ नागरिकांची तपासणी करण्यात आली.

 - महिलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करत, कर्करोगाच्या (तोंड, स्तन आणि गर्भाशय) तपासणीसाठी एकूण ८१,६०२ नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले.

 * गरोदर मातांसाठी ११,४५४ एएनसी (ANC) तपासणी करण्यात आली आहे

 जिल्हामध्ये या अभियानची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी  जिल्ह्याचे पालकमंत्री,  सर्व खासदार, सर्व  आमदार, जिल्हा परिषदचे माजी सर्व पदाधिकारी, नगरपालिका व नगरपरिषद सर्व पदाधिकारी, ग्रामपचायत सरपंच व उपसरपंच, गावपातळीवरील विविध समित्या आजी माजी  पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गावपातळीवर काम करणारे सर्व विभागाचे व सर्व आरोग्य यंत्रणा  यांनी  स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला उत्कृष्ट प्रतिसाद दिलाव सहकार्य केले. याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सगिता देशमुख यांनी सर्वांचे आभार मानून यशाचे श्रेय त्यांना दिले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News