आदी कर्मयोगी अभियान ; डिस्ट्रीक्ट ओरिएंटेशन संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, October 4, 2025

आदी कर्मयोगी अभियान ; डिस्ट्रीक्ट ओरिएंटेशन संपन्न

 



नांदेड : धरती का आबा भगवान शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे हे 150 वे वर्ष आहे. या आदी सेवा पर्वाच्या स्मरणार्थ केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाच्या वतीने "आदी कर्मयोगी अभियान-प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रम " हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेवटच्या घटकांपर्यंत सेवा व लोककेंद्रित विकासाची पूर्तता करणे या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यानुषंगाने डॉ.शंकरराव चव्हाण नियोजन भवनच्या सभागृहात नुकतेच डिस्ट्रीक्ट ओरिएंटेशन सेशन संपन्न झाले . 

     यावेळी जिल्हाधिकारी राहूल कर्डिले , दृकश्राव्य माधमाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व विविध विभागाचे जिल्हा प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते.  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंतुला यांनी प्रास्ताविकातून या अभियानाची माहिती दिली. सहायक प्रकल्प अधिकारी (विकास / योजना) प्रदीप नाईक यांनी पीपीटी प्रेझेंटेशन केले.

     याप्रसंगी डिस्ट्रीक्ट मास्टर ट्रेनर वन परिक्षेत्राधिकारी सचिन धनगे , अधिक्षक संदीप कदम , उप अभियंता एस .पी. गोविंदवाड , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के.पी. गायकवाड , बाल विकास प्रकल्पाधिकारी उमेश मुदखेडे , विस्तार अधिकारी (पं) वसंत वाघमारे व केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे यांनी या अभियानाविषयी सर्व विभाग प्रमुखांना पुढील माहिती दिली. विकसित भारत @ 2047 च्या दृष्टीने शेवटच्या टप्प्यातील अभिसरण व प्रभावी सेवा समर्पणाला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील 20 लाख युवा आदिवासी नेत्यांना प्रशिक्षीत व एकत्रित करून त्यांच्या भरीव सहभागातून  देशातील 30 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 550 जिल्ह्यातील तीन हजार तालुक्यांमधील एक लाख आदिवासी गावांमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करून "आदिवासी गाव व्हिजन 2030 घोषणापत्र " मंजूर करण्यात येणार आहे. ही जगातील सर्वात मोठी  तळागाळातील आदिवासी नेतृत्व चळवळ आहे. याप्रसंगी सर्वांना जिल्हाधिकारी श्री कर्डिले यांनी आदी कर्मयोगी शपथ दिली.

           


" नांदेड जिल्ह्यातील 169 आदिवासी गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. शासनाचा हा अभिनव उपक्रम आहे.' कर्मयोग ' या संकल्पनेवर हे आधारित आहे. यामध्ये विविध विभागाचा प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका , जबाबदारी व आत्ममूल्यांकन हे महत्वाचे आहे. आदी कर्मयोगी अभियानाचे ठळक मुद्दे पुढील प्रमाणे : आदिवासी पाड्यातील लोकांना सक्षम बनविणे तसेच स्थानिक नेतृत्वाला संधी देणे , आदी कर्मयोगी अभियान हे सेवा , संकल्प व समर्पण या मुल तंत्रावर आधारलेले आहे."

-राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी , नांदेड

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News