नांदेड : जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा व ०१ नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता आरक्षण सोडत कार्यक्रम बुधवारी (ता.०८.१०.२०२५ ) संबंधित उप विभागीय अधिकारी कार्यालयात होणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रविवारी (ता.५) जाहीर केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा व ०१ नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला य सर्वसाधारण महिलांसह) आरक्षण सोडतीचा कार्यक्रम-२०२५ जिल्हाधिकारी यांनी पत्र (नगरपरिषद प्रशासन) क्रं.२०२५/नपाप्र/का-१/टे-३/सानि-२०२५/सीआर-३९ ता.०५.१०.२०२५ जाहीर केला आहे. तो त्या- त्या उप विभागीय अधिकारी कार्यालयात उप जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात नगरपंचायतीच्या आरक्षण सोडत व तत्सम कामकाज बुधवारी (ता. ८) रोजी होणार आहे .
सोडतीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे : ता.०८.१०.२०२५ वेळ-सकाळी १०.०० वा : उपविभागीय अधिकारी कार्यालयात अनुक्रमे देगलूर , बिलोली , धर्माबाद , भोकर , हदगाव , लोहा ,कंधार , किनवट आणि दुपारी ०२.०० वा : मुखेड , कुंडलवाडी , उमरी , मुदखेड व हिमायतनगर




No comments:
Post a Comment