किनवट : तालुक्यातील अंबाडी येथील रहिवाशी तथा उत्तमज्योत आदिवासी आश्रम शाळा, ढाणकी येथील माध्यमिक शिक्षक प्रमोद सोमाजी तामगाडगे यांना 'बी द चेंज फाउंडेशन शिर्डी जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र' यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे. याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
त्यांचे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान , विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी केलेले अथक प्रयत्न आणि शैक्षणिक आणि सहशालेय कार्यातील आदर्श सेवेसाठी त्यांची निष्ठा , समर्पण भावना आणि परिश्रम अनेक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. गुणवत्तापूर्ण कार्यासाठी , शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी व समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या कार्याबद्दल त्यांना या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. या गौरवाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




No comments:
Post a Comment