किनवट तालुक्यातील 563 शिक्षकांची कोविड-19 तपासणी : 4 बाधित, 65 आरटीपिसीआर अहवाल प्रतिक्षेत ; 99 जणांची तपासणी बाकी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, November 22, 2020

किनवट तालुक्यातील 563 शिक्षकांची कोविड-19 तपासणी : 4 बाधित, 65 आरटीपिसीआर अहवाल प्रतिक्षेत ; 99 जणांची तपासणी बाकी

 



किनवट : शासन निर्णयानुसार इयत्ता नववी ते बारावीला अध्यापन करणारे शिक्षक व निवासी आश्रम शाळा तथा वसतिगृहातील शिक्षकेत्तर कर्मचारी अशा एकूण 563 जणांची कोविड- 19 ( covid-19 ) अंतर्गत तपासणी करण्यात आली असून त्यापैकी तीन शिक्षक व एक लिपिक बाधित आढळून आले आहेत. 

            23 नोव्हेंबर पासून इयत्ता नववी ते बारावी वर्ग सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. याकरिता या वर्गाला अध्यापन करणारे शिक्षक व निवासी आश्रम शाळेतील तथा वसतीगृहातील शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोविड-19 अंतर्गत आरटीपीसीआर ( rt-pcr ) व ऍन्टीजन टेस्ट करून घेण्याचा शासन निर्णय पारित झाला होता. त्यानुसार  शाळेतील शिक्षकांना दिनांक निहाय नियोज णाप्रमाणे तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाची ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे एकूण  252 व ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे हे 177 व प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूर येथे 21 असे एकूण 450 एन्टीजेन टेस्ट घेण्यात आल्या आहेत. यापैकी तीन शिक्षक व एक लिपिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे 113 आरटीपीसीआर स्वॅब घेण्यात आले असून तपासणीकरिता नांदेड येथील प्रयोगशाळेकडे ते पाठवले आहेत, त्यापैकी 48 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर उर्वरित 65 स्वॅबचे अहवाल उद्यापर्यंत त्यांचे प्राप्त होतील.

              उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर मध्ये  वैद्यकीय अधीक्षक डॉ. अब्दुल नसिर अब्दुल बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन गोणेवार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रियंका वानखेडे, धम्मपाल दवणे व लक्ष्मण वाकोडे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. अशी माहिती तालुका मिडिया समन्वय अधिकारी उतम कानिंदे यांनी दिली.

" तालुक्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय एकूण 79 असून त्यामधील 662 शिक्षकांची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. आज तपासणीच्या तिसऱ्या दिवशी एकूण 563 जणांची तपासणी करण्यात आली असून यापैकी एकुण 4 चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत . नियोजनानुसार आणखी 99 व्यक्तींची तपासणी करणे बाकी आहे.

 -अनिलकुमार महामुने, 

गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, किनवट

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News