24 सप्टेंबर 2021 रोजी अंगणवाडी सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 21, 2021

24 सप्टेंबर 2021 रोजी अंगणवाडी सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन




किनवट : अंगणवाडी सेविकांना दिलेल्या मोबाइल हँडसेट मध्ये अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने शुक्रवार (दिनांक 24 सप्टेंबर 2021) रोजी मोबाईल वापसी करण्यात येणार असून प्रकल्पांतर्गत सर्व अंगणवाडी सेविकांनी बाल विकास प्रकल्प कार्यालय किनवट येथे मोबाईलसह उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्यावतीने केले आहे.

            बालविकास प्रकल्प कार्यालयाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राज्यातील अंगणवाडी केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या लाभाची अद्ययावत माहिती शासनाला प्राप्त व्हावी यासाठी महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीसेविकांना मोबाईल वितरित केले होते.  परंतु मोबाईलमधील तांत्रिक अडचणीमुळे अंगणवाडी सेविकांना माहिती देणे त्रासदायक बनले. यासंदर्भात शासनाला वेळोवेळी सांगूनही दखल घेत जात नसल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाने शासनाला मोबाईल वापस करण्याचा निर्णय घेतला. 

       यापूर्वी मोबाईलच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेच्यावतीने शासनाला 17 ऑगष्ट 2021  पर्यंत मुदत दिली होती. तसेच दिनांक 4 ऑगष्ट 2021 रोजी महिला बाल विकास मंत्री, सचिव व आयुक्तासोबत संघटनेची बैठक झाली. मात्र अद्यापही मोबाईलच्या समस्या कायम  आहेत.  त्यामुळे बाल विकास प्रकल्प कार्यालयामार्फत शासनाला मोबाईल वापस करण्यासाठी दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजी दु 2:00 वा मोबाईल वापसी आंदोलन करण्यात येणार आहे. बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गतच्या सर्व अंगणवाडी सेविकांनी मोबाईलसह  बालविकास कार्यालया जवळ उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे तालुकाध्यक्ष रेणुका राठोड व सुरेश जाधव यांनी केले आहे


 

एकदा प्रकल्पाला परत केलेले मोबाईल कोणी कितीही दबाव टाकला तरी परत घेऊ नयेत जोपर्यंत शासन  कृती समितीशी चर्चा करून निर्णय घेत नाही तोपर्यंत अंगणवाडी सेविकांनी मोबाईल घेऊ नये.

-अशोक जाधव, 

जिल्हाध्यक्ष,अंगणवाडी संघटना

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News