जागतिक शौचालय दिनानिमित्‍त जिल्‍हयात विविध उपक्रम ; मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची माहिती - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, November 17, 2021

जागतिक शौचालय दिनानिमित्‍त जिल्‍हयात विविध उपक्रम ; मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची माहिती




                 

नांदेड,17 : दिनांक 19 नोव्‍हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. त्‍यानिमित्‍त राज्‍य शासनाच्‍या वतीने हागणदारीमुक्‍त झालेल्‍या ग्रामपंचायतीमध्‍ये स्‍वच्‍छतेचे विविध उपक्रम राबविण्‍याच्‍या सूचना दिलेल्‍या आहेत. त्‍यानुसार उद्या शुक्रवारी जिल्‍हयातील सर्व गावातून स्‍वच्‍छता विषयक विविध उपक्रम राबविण्‍यात येणार आहेत. या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन जागतिक शौचालय दिवस साजरा करावा, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.


     सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता या अनुषंगाने राज्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 ची सुरुवात झालेली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सदर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्‍हयात विशेष मोहिम हाती घेण्‍यात आली आहे. यात  सार्वजनिक शौचालय, शाळा व अंगणवाडी शौचालय तसेच ग्राम पंचायत कार्यालय शौचालयाची स्‍वच्‍छता करणे तसेच सार्वजनिक शौचालयामध्‍ये पाण्‍याची सुविधा व वीज जोडणी उपलब्‍ध करुन देणे तसेच सार्वजनिक शौचालय, शाळा व अंगणवाडी शौचालय व ग्राम पंचायत कार्यालय शौचालय नादुरुस्‍त असल्‍यास त्‍यांची दुरुस्‍ती करणे आदी उपक्रम रा‍बविण्‍यात येणार आहेत. तरी गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी यांनी गाव निहाय नियोजन करुन उपक्रमाचे आयोजन करावे. या उपक्रमात सर्व नागरीकांनी सहभाग घेवून ही मोहिम यशस्‍वी करावे, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News