राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद साधेपणा व विनम्रतेचे मूर्तिमंत उदाहरण -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी #राजभवन येथे भोजपुरी दिवस व डॉ.राजेंद्र प्रसाद जयंती समारंभ संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, December 3, 2021

राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद साधेपणा व विनम्रतेचे मूर्तिमंत उदाहरण -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी #राजभवन येथे भोजपुरी दिवस व डॉ.राजेंद्र प्रसाद जयंती समारंभ संपन्न

 


मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे)  : देशाचे दोन वेळा राष्ट्रपती व घटना समितीचे अध्यक्ष राहिलेले डॉ.राजेंद्र प्रसाद हे साधेपणा व विनम्रता या गुणांचे मूर्तिमंत उदाहरण होते.  त्यांचे जीवनचरित्र नव्या पिढीला शिकवल्यास त्यातून उत्तम नागरिकांची पिढी तयार होईल,  असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

            डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘भोजपुरी पंचायत’ या मासिकातर्फे 'भोजपुरी दिवस व डॉ राजेंद्र प्रसाद जयंती' समारंभाचे गुरुवारी (दि.२) राजभवन येथे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. 



            कार्यक्रमाला पार्श्वगायक उदित नारायण, 'अभियान' संस्थेचे अध्यक्ष अमरजित मिश्रा, भोजपुरी पंचायतचे संपादक कुलदीप श्रीवास्तव, प्रो.जयकांत सिंह  तसेच भोजपुरी, साहित्य, सिनेमा व समाजसेवा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. 



            डॉ राजेंद्र प्रसाद इंग्रजीचे उत्तम जाणकार होते तरी देखील ते व्यक्तिगत जीवनात  भोजपुरी भाषेच्या वापराबाबत आग्रही होते. प्रज्ञावान, भाषाप्रेमी, संस्कृतीप्रेमी, श्रद्धावान व संघर्षशील असलेले डॉ.राजेंद्र प्रसाद  महात्मा गांधी यांचे प्रमाणेच प्रातःस्मरणीय असल्याचे राज्यपालांनी सांगितले.



            डॉ राजेंद्र प्रसाद यांना प्रिय असलेल्या  भोजपुरी भाषेत अधिकाधिक साहित्य निर्माण करणे ही त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे राज्यपालांनी सांगितले. सुरुवातीला राज्यपालांनी डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.  यावेळी भोजपुरी साहित्य, सिनेमा, समाजसेवा व उद्योग क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यावेळी उदित नारायण, डॉ.आझम बदर खान, अभय सिन्हा, प्रो जयकांत सिंह, आनंद सिंह, अंजना सिंह, लाल बाबू अंबिकालाल गुप्ता, लोकेश सोनी, अमरजित मिश्रा व रत्नाकर कुमार शास्त्री यांचा राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उदित नारायण यांनी यावेळी भोजपुरी गीत सदर करून उपस्थितांची मने जिंकली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News