*आजादी का अमृत महोत्सव व महाजीवीका अभियान अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापक यांचे एकदिवसीय प्रशिक्षण* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, June 11, 2022

*आजादी का अमृत महोत्सव व महाजीवीका अभियान अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापक यांचे एकदिवसीय प्रशिक्षण*




नांदेड : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती (उमेद) अभियानांतर्गत स्वयं सहायता समूहांना विविध बँकेद्वारे बँक पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात येतो या करिता राज्य व जिल्हा स्तरावर प्रत्येक बँक शाखेला उद्दिष्ट देण्यात येते सदर उद्दिष्ट साध्य व्हावे व बँक व्यवस्थापक यांचे सहकार्य प्राप्त व्हावे याकरिता दिनांक 13 /06/ 2022 रोजी सकाळी 11 ते 05 या वेळेत बँक व्यवस्थापक यांचे एक दिवशीय प्रशिक्षण स्थळ जिल्हा नियोजन भवन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित केली आहे .


सदर प्रशिक्षणास नांदेड जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापक उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकुर- घुगे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबकले यांनी केले आहे.  जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार ,  जिल्हा व्यवस्थापक माधव भिसे , आर्थिक समावेशन व प्रशिक्षक दीक्षित हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News