एक "नाथ" सेना "नेते" सुरत मध्ये महाराष्ट्राचे सत्ता केंद्र गुजरातमध्ये - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, June 21, 2022

एक "नाथ" सेना "नेते" सुरत मध्ये महाराष्ट्राचे सत्ता केंद्र गुजरातमध्ये

 


मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : एकनाथ शिंदे यांचा हा पूर्वनियोजित प्लॅन होता.बंड करण्यासाठी पुर्व तयारी विधानपरिषद निवडणुकीत आमदार एकत्र आल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणे सहज सोपे झाले. पस्तीस आमदारांना एकत्र एकाच छताखाली आणायचे असते तर  अनेक फोन करावे लागेल असते .कदाचित ही बातमी फुटली असती. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार एकत्र होते.  या सर्व आमदारांची  आपला मतदानाचा हक्क बजावला मतदानाचा हक्क बजावला. व संध्याकाळी सर्व आमदार जेवण पान करून गुजरात दिशेने जातात. अत्यंत गुप्तपणे हा गेम केला गेला. पालघर नंतर आमदारांची सुरक्षा ही गुजरात पोलीसांनी घेतली. इतके आमदार राज्य सोडून जातात व त्यांची माहिती गृहखात्याला नाही! हे कसं काय शक्य आहे? 

        भुभिगत असलेले सर्व आमदार सुरत मध्ये आहेत.तेथून ते अहमदाबादला रवाना होतील. आणि अहमदाबादला अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या समर्थक शिष्टमंडळाची भेट होऊ शकते. जी बैठक होणार आहे या बैठकीत संभाव्य  राजकीय घडामोडी चर्चा होईल.  राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यासोबतच भाजपा नेते गिरीश महाजन, संजय कुटे हे उपस्थीत आहेत. एकनाथ शिंदे आणि जर या ठिकाणावरून संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन परत गेले तर संजय राठोड आणि इतर काही आमदार देखील या बैठकीमध्ये असू शकतात.  

         महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटसची तयारी सुरू केली आणि आता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी राजकीय खलबते चालू आहेत. शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे उध्दव ठाकरे यांचा संदेश घेऊन एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सुरत येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले आहेत. महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडीवर साऱ्या देशातील जनतेचे लक्ष आहे. शिवसेना आमदारांच्या जीवाला धोका निर्माण झाला अशी माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता लवकरच राजकीय स्थित्यंतर होणार यात शंका नाही.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News