आजादी का अमृत महोत्सव व उमेद अभियानांतर्गत किनवट रेल्वे स्टेशनवर आदिवासी महिलानी बांबू पासून बनविलेल्या विविध वस्तुंच्या स्टॉलचे उद्घाटन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Saturday, July 23, 2022

आजादी का अमृत महोत्सव व उमेद अभियानांतर्गत किनवट रेल्वे स्टेशनवर आदिवासी महिलानी बांबू पासून बनविलेल्या विविध वस्तुंच्या स्टॉलचे उद्घाटन

 किनवट : शनिवारी (ता. 23 ) उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुक्यातील आदिवासी महिलांच्या स्वयंसहायता समुहांनी बांबूपासून तयार केलेल्या विविध वस्तूंच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.

         भारतीय रेल्वे नांदेड विभाग व जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष नांदेड महाराष्ट्र    राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ता. 20 जून रोजी जिल्हातील स्वयं सहायता समूहाना नांदेड जिल्ह्यातील 16 रेल्वे स्थानकावर स्वयंसहायता समूहाच्या  उत्पादित मालाचे स्टॉल लावण्याच्या संदर्भाने जिल्हा अभियान कक्षात बैठक पार पडली होती.    

           त्याप्रसंगी नांदेड विभागाचे प्रमुख वाणिज्य निरीक्षक  संजीव कुमार शर्मा व सिकंदराबाद विभागाचे प्रमुख  मनोज कुमार यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशन वर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील (उमेद) च्या महिला स्वयंसहाय्यता समूहांना रेल्वस्थानक प्लॅटफॉर्मवर गटांनी बनवलेल्या अन्नपदार्थ आणि विविध वस्तू यांची विक्री करण्यासाठी रेल्वस्थानकावर अत्यंत कमी दरात जागा उपलब्ध करून देऊ असा महत्वकांक्षी निर्णय  बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना, महिला स्वयंसहाय्यता समूहांनी बनवलेल्या रुचकर पदार्थ आणि विविध वस्तू यांची गावरान मेजवानी खाण्यासाठी व वस्तूची खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. तेव्हा बचत गटातील महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच आपली आर्थिक प्रगती करावी तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांना असे मार्गदर्शन करून प्रत्येक स्थानकावर रेल्वे बोर्डाकडून मार्केटिंग आउटलेट उपलब्ध करून लावण्यासंदर्भात  मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे व प्रकल्प संचालक डॉ. संजय तूबाकले यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले   होते.

        याच अनुषंगाने तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती किनवटच्या वतीने केंद्र शासनाच्या 'One Station One Stall'  योजनेअंतर्गत किनवट रेल्वे स्टेशन येथे अनुसया महिला स्वयं सहाय्यता समुह जवरला(काजीपोड) यांनी बांबू पासून बनविलेल्या विविध वस्तुंच्या स्टॉलचे उदघाटन स्टेशन प्रबंधक  अरविंद कुमार , मनोजकुमार(CCI Adb.), गौतम वाहूळे(BMM) यांचे हस्ते करण्यात आले.

         यासाठी गट विकास अधिकारी सुभाष धनवे, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, जिल्हा व्यवस्थापक (मार्केटिंग) धनंजय भिसे  व  जिल्हा व्यवस्थापक(क्षमता बांधणी) द्वारकादास राठोड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले

      तसेच स्टॉल लावण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी शेख जाहिरोद्दीन (Parcel portal),भगवान केंद्रे, विनोद मगर (SERES), पांडुरंग हाटकर, सय्यद जावेद, सचिन दुधारे, आकाश म्हस्के, पप्पू जाधव व मनोजकुमार (JE Telli.) यांनी सहकार्य केले .


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News