नामदेवराव भिवबाजी धुप्पे यांचे निधन बुधवारी (ता.3) सकाळी 11 वा. अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, August 2, 2022

नामदेवराव भिवबाजी धुप्पे यांचे निधन बुधवारी (ता.3) सकाळी 11 वा. अंत्यसंस्कार

 



किनवट : तालुक्यातील सिंदगी (मोहपूर) येथील मूळ निवासी (हल्ली मुक्काम माळबोरगाव ) ज्येष्ठ नागरिक नामदेवराव भिवबाजी धुप्पे (वय 71 वर्षे ) यांचे गुरुवारी (ता. 2) सायंकाळी 5 वाजता दीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता.3) रोजी सकाळी 11 वाजता मौजे माळबोरगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

        अतिदुर्गम- डोंगरी सिंदगी (मोहपूर) गावात 1951 मध्ये जन्मलेल्या नामदेवराव धुप्पे यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत त्याकाळी एम. ए. पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. परंतु नोकरीचे अनेक आदेश प्राप्त होऊनही त्यांनी नोकरी स्विकारली नाही. माळबोरगाव येथे येऊन त्यांनी स्वतंत्र व्यवसाय केला.

         त्यांच्या पश्चात पत्नी निवृत्त अंगणवाडी कार्यकर्ती दीनाबाई (उपाख्य बिनाबाई), दोन भाऊ सामाजिक कार्यकर्ते माधव धुप्पे व दामोधर धुप्पे ( सिंदगी ), दोन बहीणी शांताबाई स्मृतिशेष देवराव कावळे (सुभाषनगर, किनवट ) व सुगंधाबाई  (खोडद), दोन मुली संगीता मनोहर पाटील व जोत्सना श्याम भगत (नांदेड), तीन मुलं विश्वास (तलाठी), विजय व धम्मदीप आणि सुना , जावई व नातवंडं असा मोठा परिवार असून निवृत्त सहायक अभियंता भरतकुमार कानिंदे (एकंबा, नांदेड ) व निवृत्त शिक्षक रमेश खरे ( आष्टा ) यांचे ते मेव्हूणे होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News