दहावी, बारावी परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण सुचना जाहीर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, November 18, 2022

दहावी, बारावी परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण सुचना जाहीर

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळ, वाशी, नवी मुंबई -मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व मान्यता प्राप्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालय माध्यमिक प्रमाणपत्र (इ १२ वी ) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी - मार्च २०२३ परीक्षेबाबत. परीपत्रक जाहीर करण्यात आले आहे मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व मान्यता प्राप्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येते की, फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ १२ वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.

        राज्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा प्रचलित पद्धतीप्रमाणे घेण्यात येणार असून, याबाबत खालील सूचना माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक/प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालक, सर्व संबंधित घटक यांच्या निर्दशनास आणून देण्यात येत आहेत.


१) सदर परीक्षा १००% अभ्यासक्रमावर आधारित घेण्यात येणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, श्रेणी अंतर्गत मूल्यमापन इत्यादी सर्व परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार निर्धारित कालावधीतच पार पाडावयाच्या आहेत.


२) परीक्षार्थ्याने प्रत्यक्ष पेपरच्या वेळी पूर्वी किमान 30 मिनिटे अगोदर आपल्या निर्धारित परीक्षा कक्षामध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे.


३) प्रचलित पद्धतीनुसार शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना निर्धारित केलेल्या केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहेत. ४) सदर परीक्षेच्या वेळेमध्ये कोणत्याही वाढीव वेळेची सवलत देण्यात येणार नसून वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या वेळेनुसार परीक्षा घेण्यात येणार आहेत.


५) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१७/(११८/१७) एस. डी.-६ दि. १६ ऑक्टोबर २०१८ नुसार पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना असणाऱ्या सर्व सोयी सवलती देण्यात येतील याची सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी नोंद घ्यावी. अशी माहिती मुंबई विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली आहे. 

      हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील वरीष्ठ शिक्षक जितेन्द्र महाजन यांच्या मतानुसार या सुचनेनुसार पुर्व परीक्षा शाळांमध्ये घेण्यात येणार आहे. क्रीडा शिक्षक विजय अवसरमोल यांनी लेखी व तोंडी परीक्षांबरोबरच शारीरिक शिक्षण व इतर श्रेणी प्राप्त विषयांवर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News