रंगकर्मी प्रतिष्ठान उदगीरच्या रंगभरण चित्रकला व निबंध स्पर्धेला किनवटमध्ये चार हजार स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, January 18, 2023

रंगकर्मी प्रतिष्ठान उदगीरच्या रंगभरण चित्रकला व निबंध स्पर्धेला किनवटमध्ये चार हजार स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद

 



किनवट : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनाबरोबरच कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी रंगकर्मी साहित्य , कला व  क्रीडा प्रतिष्ठान , उदगीर जिल्हा लातूर यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय रंगभरण चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  राज्यस्तरीय स्पर्धेचे हे सलग सातवे वर्ष आहे. यावेळी प्रथमच नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः  किनवट आदिवासी बहुल भागामध्ये सदर स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला असून किनवट व माहूर तालुक्यातून जिल्हा परिषद, प्राथमिक माध्यमिक खासगी अनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमाच्या एकूण  80 शाळांमधून एकूण 4000 विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय रंगभरण चित्रकला निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला.

           सदर स्पर्धा ह्या शाळेतच व शाळेच्या वेळेनुसार घ्यावयाच्या होत्या, स्पर्धेसाठी लागणारा कागद हा संयोजकाकडून पुरविण्यात आला, सदर रंगभरण चित्रकला व निबंध या प्रत्येक स्पर्धेसाठी प्रथम 4001, द्वितीय 3001, तृतीय 2001बक्षीस तर उत्तेजनार्थ 100 घड्याळी देण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेचा भव्यदिव्य बक्षीस वितरण सोहळा 29 जानेवारी 2023 रोजी उदगीर जि.लातूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.बिभीषण मद्देवाड, उपाध्यक्ष मारोती भोसले यांनी दिली.


        या राज्यस्तरीय रंगभरण चित्रकला व निबंध स्पर्धेसाठी किनवट तालुक्यातील सरस्वती प्राथमिक विद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले  विद्यालय,(प्राथमिक व माध्यमिक) गोकुंदा, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घोटी, रतनीबाई राठोड प्राथमिक शाळा किनवट,सुमितीबाई हेमसिग नाईक कन्या माध्यमिक विद्यालय सुभाष नगर किनवट, संत सखाराम महाराज माध्यमिक विद्यालय राजगडतांडा, मातोश्री कमलताई ठमके माध्यमिक विद्यालय सुभाष नगर किनवट, महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालय सुभाषनगर, श्री बाबासाहेब मुखरे माध्यमिक विद्यालय, शिवबाबा प्राथमिक निवासी आश्रम शाळा चिखली (खु), इंदिरा गांधी माध्य.विद्यालय गोकुंदा, ग्यानज्योती पोदार इंग्लिश मीडियम स्कूल बेंदीतांडा, शांती निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल कोठारी (चि), ईरा इंग्लिश मीडियम स्कूल कोठारी (चि), मातोश्री कमलाबाई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल कोठारी (चि ), जिल्हा परिषदेच्या शाळेमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजगडतांडा, जिप बेंदीतांडा,जिप गणेशपुर(जुने),जिप गणेशपुर(रोड), जिल्हा परिषद हायस्कूल  मांडवी , जिल्हा परिषद पारडी हायस्कूल पार्डी- बोधडी (खु ), जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा मारेगाव (व) , जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा खंबाळा या शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

            ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी किनवट तालुक्याचे कार्यतत्पर, कार्यक्षम गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी पंचायत समिती शिक्षण विभागाकडून सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासंबंधीचे पत्र काढून मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले.तसेच सहभागी शाळेचे संस्थाचालक शाळेचे मुख्याध्यापक, शाळेतील शिक्षक,कलाशिक्षक त्याचबरोबर तालुक्यातील शिक्षक मित्रपरिवार यांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News