25 जून रोजी शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन ▪️शासन आपल्या दारी कार्यक्रम - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, June 24, 2023

25 जून रोजी शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन ▪️शासन आपल्या दारी कार्यक्रम




नांदेड (जिमाका)  : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत रविवार 25 जून रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन अबचलनगर मैदान येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.


या शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिरात सहभाग घेण्यासाठी अर्जदारांनी sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड व जन्मतारखेचा पुराव्यासह (पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, दहावी प्रमाणपत्र यापैकी एक) वर शिबिराच्या ठिकाणी सकाळी 11 वा. चाचणीसाठी उपस्थित राहून फेसलेस व नॉन फेसलेस शिकाऊ अनुज्ञप्ती सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News