योगा करा कोरोनाला पळवा -सुरेश पाटील - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 21, 2021

योगा करा कोरोनाला पळवा -सुरेश पाटील

 

मंगरूळपीर : गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने योगा करतांना

 योगा करा कोरोनाला पळवा 

-सुरेश पाटील

जागतिक योग दिना निमित्त योगाचे महत्व पटवून देणारा सुरेश पाटील यांचा लेख आज देत आहोत . -संपादक



          कारोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण मानवाने मास्क सॅनिटायजर , शारीरिक अंतर , घरामध्ये राहून यावर मात करू शकतो. प्राचीन भारतीय ऋषी , मुणीनी लावलेल्या योग बलाने यशस्वीपणे मात करू शकतो . निरोगी शरीरात निरोगी मन असते म्हणजे Sound mind in a Sound Body मणुष्य जन्मामध्ये तो सर्वाना वेळ देतो परतुं आपल्या स्वत : च्या शरीराकडे दुर्लक्ष करतो . सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे " जान है तो जहान है " दर शंभर वर्षानी एक रोग आलेला आहे . प्लेग , महामारी, फ्ल्यू , कॉलरा यावर मात करण्यासाठी शारिरीक व मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी भारतातील पुरातन काळातील योग विद्या संपूर्ण विश्वाने स्वीकारली आहे . योग साधना करतांना यम , नियम , आसन , प्राणायाम , प्रत्याहार धारणा , ध्यान समाधी , मुद्रा , षटकर्य या साधनाचा अभ्यास महत्वाचा आहे . सकाळी पाच वाजता उठले पाहिजे . शौचालयास जाऊन आल्यानंतर घरी मोकळया जागेत स्वच्छ ठिकाणी प्राणायम  करण्यास सुरुवात केली पाहीजे . योगाची सुरुवात प्रार्थनेने करावी म्हणजे मन प्रसन्न होते.

        शारीरिक हालचाली केल्यानंतर प्राणायामचा राजा १ ) कपालभाती- सुरुवातीला पदमासन , अर्धपदमासनास बसून श्वास घेणे ( पुरक ) सोडण्याची रेचक क्रिया आपोआप होते . फायदे : - सर्दी कफ , क्षय , डोके दुःखी , छातीतील धडधड करणे , घाबरणे , चिंता मानसिक संतूलन कमी रक्त शुध्दी कातडीचेविकार शरीर ताजेतवाने इलाभ होतात . २ ) अनुलोम -विलोम : - उजव्या नाक पुडीने श्वास घेणे डावीने नाक पुडीने श्वास सोडणे उलट सुलट क्रिया फायदे : शरीर ताजे तवाने होते , स्मरण शक्ती वाढते . ३ ) भसरीका : - लांब श्वास घेणे व सोडणे फायदे : - हृदयातील छिद्रे मोकळे होतात . रोग प्रतिकार शक्ती वाढते . पाठ , वात . ४ ) पवन मुक्तासन -पध्दत : - गुडघे छातीवर ठेवून वर हात बांधून सुरुवातीला १-१ पाय नंतर दोन्ही पाय ठेवनू गुडघे कपाळाला लावणे फायदे : - पोट , कंबर , पचन यासाठी लाभदायक ५ ) सर्वागास पध्दत : -खांदयाच्या रेषेत पाय सरळ वर करून थांबणे फायदे : -दमा , खोकला , हात , पाय मुळव्याध , मधुमेह , त्वचा रोग व छातीला लाभदायक होते . या सर्व आसनाने कोरोना या महाभंयकर आजारावर आपण मात करू शकतो . 

-सुरेश पाटील किनवट 

मो . नं.९९ २११००५८० 

ई.मे : - singer.kinwat@gmail.com

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News