माहूरात महिला बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती मसाले व हस्तकला वस्तू विक्रीची प्रदर्शणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, October 9, 2021

माहूरात महिला बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती मसाले व हस्तकला वस्तू विक्रीची प्रदर्शणी

 



नांदेड :  माहूर येथे नवरात्र महोत्सवा निमित्‍त माहूर नगर पंचायत अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती मसाले व हस्तकला वस्तू विक्रीचे प्रदर्शन भरविण्‍यात आले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन महाराष्ट्र ग्रामीण बँकचे सहायक व्यवस्थापक अक्षय चौधरी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी मुख्याधिकारी राकेश गिड्डे, वैजनाथ स्वामी, सहायक प्रकल्प अधिकारी देविदास जोंधळे, संदीप थोरात, गणेश जाधव, अविनाश रूनवाल व नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.



        नवरात्र महोत्‍सवात सात दिवस हे विक्री प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. यात विविध प्रकारचे आकाश कंदील, दिवे, घरगुती मसाले व हस्तकला वस्तू विक्रीसाठी ठेवण्‍यात आल्‍या आहेत. यासाठी प्रेरणा महिला बचत गट व समृध्‍दी महिला बचत गटांनी पुढाकार घेतला आहे. या प्रदर्शनात रुचकर दही, कोशिंबीर, थालीपीठ नास्‍ता ठेवण्‍यात आला आहे. यासाठी बचत बटाच्‍या  अर्चना कृष्णा माने, सुप्रीया संदिप कान्नव, शितल विजय सौंदलकर, संगीता हणमंतराव ईबितदार, महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍या तालुका समन्वयक भाग्यश्री वसंतराव भगत आदी परीश्रम घेत आहेत. सदर प्रदर्शनीला भावीकांनी भेट द्यावी असे आवाहन माहूर नगर पंचायतच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News