*वैद्यकीय विद्यार्थ्यी गुन्हेगारांचे भक्ष? ; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष!* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, June 5, 2022

*वैद्यकीय विद्यार्थ्यी गुन्हेगारांचे भक्ष? ; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष!*



नांदेड : येथील डाॅ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला असून, याठिकाणी राज्यातून व राज्याबाहेरून विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी येथे येत असतात, पण गत अनेक महिन्यांपासून विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या जीवाशी खेळले जाणारे प्रकार या विद्यालयीन परिसरता घडले जात असून, त्यांचे मोबाईल, पर्स चाकूचा, बंदुकीचा धाक दाखवत लुटणे, मुलींची छेड काढणे, महाविद्यालयीन परिसरात मद्यपान करणे अश्या अनेक बाबी खुला परिसर असल्याकारणाने घडत आहेत. असाच एक अनुचित प्रकार  ता. ०४ जून रोजी दुपारी २:३० वाजता घडला. एका वैद्यकीय महाविद्यालयीन मुलासोबत चाकूचा धाक दाखवून मोबाईल नेल्याची घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे व पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून याप्रकाराबाबत लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे! शेजारीच असलेल्या  पांगरी गावाला जोडणारा मार्ग या कॅम्पसमधून गेला असल्याने या क्रूरवृत्तीच्या अपप्रवृत्तींना वाव मिळत आहे.

       यापूर्वीही ता.११ ऑक्टोबर २०२१ रोजी ३९२, ३४ शस्त्र अधिनियम ३,२५,४,२५ कलमान्वये गुन्हा ( गु.र.नं. ०७२४/ २०२१ ) दाखल झाला होता, पण तपास कोणत्या दिशेला गेला याचा फिर्यादी व वैद्यकीय विद्यार्थी परिषद यांना शोध लागला नाही. नांदेड ग्रामीण पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी हे फक्त भाषणापुरते काम करतात का? असा विद्यार्थ्यांचा सवाल असून आतापर्यंत घडलेल्या सर्व गुन्ह्यांचा गांभीर्याने शोध घ्यावा व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा. 


         सद्यस्थितीत अनेक महिन्यांपासून घडत असलेले प्रकार गंभीर आहेत, पण या सर्व विषयांकडे पोलीस प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष आहे का? महाविद्यालयीन प्रशासन सुरक्षिततेबाबत का निष्काळजीपणा करतेय ? डीन डॉ. जमदाडे याबाबत काय भूमिका घेणार? याबाबत पालकमंत्री महोदय यांनी विशेष लक्ष द्यावे, ही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे...

 *वैद्यकीय विद्यार्थी परिषद मागण्या*


१. महाविद्यालयीन परिसर बंदिस्त (close campus) करण्यात यावा.


२. पांगरी गावाला जोडणारा मार्ग बंद करून,पर्यायी मार्ग नेमण्यात यावा.


३. परिसरामध्ये सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्यात यावी.(१ पोलीस चौकी असावी.)


४. संपूर्ण कॅम्पस/परिसर तारेचे कुंपण/संरक्षक भिंत बांधून सुरक्षित करण्यात यावे.


५. पालकमंत्री महोदयांनी विशेष लक्ष घालून हा विषय तात्काळ मार्गी लावावा.




वैद्यकीय विद्यार्थी हे उज्वल भारताचे भविष्य असून, त्यांनी गत २ वर्षातील कोविड -१९ स्थितीला सुधारण्यासाठी आपले योगदान देऊन देशकार्याला मदत केली होती, नागरिकांचा जीव वाचविणाऱ्यांचा जीव धोक्यात जाणार असेल तर भविष्यातील बदलत्या उज्वल भारताला ते कसे वाचवू शकतील! यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष देऊन असे अनुचित प्रकार घडणार नाहीत याबद्दल ठाम भूमिका घेतली पाहिजे

-एक सुज्ञ नांदेडकर




*भावी डॉक्टर भितीच्या छत्रछायेखाली*

   


वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या काही दिवसापासून रुग्णालय आवारात वारंवार गाडी चोरीचे प्रकार घडत आहेत. तसेच दोन निवासी डॉक्टर व एक इंटर्न यांच्या गाड्या चोरीस गेलेल्या आहेत, प्रशासनाने सुरक्षेचे दृष्टीने विद्यालय परिसरात सीसीटीव्ही-कॅमरे लावले आहेत पण त्यात बघण्याचा प्रयत्न केले असता, हे  कॅमरे हे बंद असल्याचे आढळले. तसेच पार्किंग व्यवस्थापक वेळेवर उपस्थित नसल्याने हे प्रकार वारंवार घडत आहेत. प्रशासनाला वेळोवेळी विनंती करूनही रुग्णालय प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही. यासाठी विद्यालय परिसरात विद्यार्थी बांधवांनी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.जमदाडे यांना घेराव घातला असता, त्यांनी पोलीस प्रशासनास बोलवून कारवाई केली आहे. तसेच विद्यार्थ्यांतर्फे निवासी डॉक्टर व प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांच्याकरिता "स्वतंत्र वाहनतळ व पोलीस निरिक्षक" यांची नियुक्ती करण्यात यावी,अशी मागणी देखील केली आहे. असे वैद्यकीय विद्यार्थी परिषदेचे सचिव ओम मंगरूळकर यांनी कळविले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News