*23 जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, June 22, 2022

*23 जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन*

 


 

नांदेड (जिमाका)  : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची 23 जून 1894 रोजी स्थापना झाली. या दिवसाच्या स्मरणात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस व सप्ताह साजरा केला जातो. खेळाडूंना सर्वोकृष्ट बनविण्यासाठी ऑलिंपिक दिवस साजरा करण्यात येतो. चालू वर्षे हे भारताचे अमृत महोत्सवी वर्षे म्हणुन साजरा करण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका व ऑलिंपिक असोसिएशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन व सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.

 

नांदेड जिल्हयात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन व सप्ताह 23 जून ते 28 जून या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहानिमित्त 23 जून रोजी सदृढ भारत ऑलिंपिक दौड, 24 जून रोजी सायकल रॅली, 25 जून  रोजी निबंध स्पर्धा- भारत ऑलिंपिकमध्ये काल, आज आणि उद्या, 26 जून रोजी चित्रकला स्पर्धा- भारतीय पुरातन खेळ व ऑलिंपिक, 27 जून,2022 रोजी विविध खेळांच्या जिल्हास्तर स्पर्धाचे आयोजन, 28 जून 2022 वक्तृत्व स्पर्धा- भारतीय ऑलिम्पीयन भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ, 29 जून रोजी ऑलिंपिक मशाल रॅली व या उपक्रमात सहभागी झालेल्या खेळाडूंना बक्षिस वितरण, प्रमाणपत्र वितरण, पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार व समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

नांदेड शहरातील शाळा / महाविद्यालयातील प्रत्येकी 50 खेळाडू मुले / मुली, विद्यार्थी शारीरिक शिक्षकासह या कार्यक्रमास उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी बालाजी जोगदंड पाटील 9420673394, 7020815826 व श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक) 9657092794 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News