प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी उपलब्ध करून दिलेल्या संधीचा आदिवासी मुलींनी लाभ घ्यावा -आमदार भीमराव केराम # 415 मुलींची झाली थेट निवड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, September 7, 2022

प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी उपलब्ध करून दिलेल्या संधीचा आदिवासी मुलींनी लाभ घ्यावा -आमदार भीमराव केराम # 415 मुलींची झाली थेट निवड

 



किनवट : आर्थिक मंदी व वाढत्या बेकारीच्या जगात प्रकल्पाधिकारी  कीर्तिकिरण पुजार यांनी नोकरी करत शिक्षण पूर्ण करण्याच्या उपलब्ध करून दिलेल्या संधीचा आदिवासी मुलींनी लाभ घ्यावा. स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या कुटूबांचा विकास करावा असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.

      महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड होसूरच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे आदिवासी मुलींसाठी भरती शिबीर आयोजित केले होते. यावेळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.   


 

           याप्रसंगी या उपक्रमाचे संकल्पक सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी  कीर्तिकिरण पुजार, टाटाच्या एचआरए ऐश्वर्या लोंढे , अभियंता प्रशांत ठमके, प्राचार्या शुभांगी ठमके यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. मंगळवारी (ता.6) मराठवाड्यातून आलेल्या 440 पैकी  254 व बुधवारी (ता.7) उर्वरित महाराष्ट्रातून आलेल्या 224 पैकी 161, अशा प्रकारे दोन दिवसात 664 पैकी 415 आदिवासी मुलींची  'ज्युनिअर टेक्निशियन' पदाकरिता निवड झाली आहे. त्यांना नोकरी करत बी.एस्सी (मॅन्युफॅक्चरिंग) पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर त्यांची पदोन्नती सुद्धा होणार आहे.

      यावेळी टाटा कंपनीचे मणीकंठम, हरिणी श्रीधर, रंजिता, संजना, सुनिता , प्रकल्प कार्यालयाचे नियोजन अधिकारी शंकर साबरे, लेखाधिकारी सुनिल पाईकराव , सहायक लेखाधिकारी डी.आर. सिंगारे , सहायक प्रकल्पाधिकारी (शिक्षण) मनोज टिळे व आदिवासी सेवक उत्तम मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. आनंद मेथे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वय तथा सहायक प्रकल्पाधिकारी (शिक्षण) नितीन जाधव यांनी आभार मानले.




" आम्ही सुद्धा कंपनीत काम केलं. अशी संधी आम्हाला विद्यार्थी असतांना आली असती तर आम्ही दोन्ही हातांनी ती लुटून घेतली असती. आदिवासी मुलींसाठी ही नामी संधी आहे. तिचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हा , कुटूंबाला आधार द्या व  शिक्षण पूर्ण करून आपलं उज्ज्वल भवितव्य घडवा.

-कीर्तिकिरण एच. पुजार, भाप्रसे, प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, किनवट "


          भरती प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प कार्यालयाचे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नागनाथ चटलेवाड , मिलिंद मुंडे, महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य शेख हैदर, उपप्राचार्य सुभाष राऊत, उप मुख्याध्यापक जुम्माखान पठाण, पर्यवेक्षक संतोषसिंह बैसठाकूर, किशोर डांगे, प्रमोद मुनेश्वर आदिंनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News