तिसऱ्या महायुद्धाला रोखण्याची ताकद फक्त बुद्ध विचारात -अभियंता प्रशांत ठमके # सिध्दार्थनगर गोकुंदा येथील गंधकुटी बुद्ध विहारात सम्यक सम्बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, November 10, 2022

तिसऱ्या महायुद्धाला रोखण्याची ताकद फक्त बुद्ध विचारात -अभियंता प्रशांत ठमके # सिध्दार्थनगर गोकुंदा येथील गंधकुटी बुद्ध विहारात सम्यक सम्बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना

 



किनवट : जागतिक उंबरठ्यावर असणाऱ्या तिसऱ्या महायुद्धाला रोखण्याची ताकद फक्त बुद्ध विचारात आहे. म्हणून शांतीचा , दुःखमुक्तीचा संदेश देणारा, जीवन जगण्याचा उत्तम मार्ग असलेल्या बौद्ध धम्माचा संदेश विश्वातील सर्व जनमानसांच्या मेंदूत ठसविण्यासाठी बुद्ध विहारं ही केंद्रबिंदू ठरली पाहिजेत, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी केले.

   


    सिद्धार्थनगर गोकुंदा येथील गंधकुटी बुद्ध विहारात सम्यक सम्बुद्धाच्या रुपाची प्रतिष्ठापना प्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके, अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे तालुका सरचिटणीस प्रा. डॉ. पंजाब शेरे व कमलाताई पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष विनोद भरणे , गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, पत्रकार गोकुळ भवरे, ऍड. मिलिंद सर्पे,  राजेश पाटील, माजी केंद्रप्रमुख विश्वनाथ नरवाडे , पर्यटन व प्रचार विभागाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे, आनंद चंद्रे, सरपंच अनुसया सिडाम, ग्रामपंचायत सदस्य निर्मला कांबळे, रेखा दांडेगावकर, पप्पू कर्णेवार , संजय सिडाम, माजी सरपंच प्रवीण म्यॅकलवार , माजी उपसरपंच शेख सलीम , सदस्य प्रतिनिधी प्रमोद कोसरे उपस्थित होते.

   


    आपले विचार मांडतांना प्रा. डॉ. पंजाब शेरे म्हणाले की , स्वतंत्र समाजाच्या धारणेसाठी धर्म आवश्यक आहे. सर्वच धर्म अनुसरणीय नाहीत. खरा खुरा धर्म माणसाच्या मनात असतो शास्त्रात नव्हे. नीतिमत्ता आणि माणूसच धर्माच्या केंद्रस्थानी असायला पाहिजे. जर असे नसेल तर तो क्रूर धर्म भोळेपणाच होय.    

       "समता प्रस्थापित करताना समाजाला बंधुभाव किंवा स्वातंत्र्याचा बळी देता येणार नाही. बंधुभाव वा स्वातंत्र्य याशिवाय समतेला कसलाही अर्थ नाही. बुद्धाचा मार्ग अनुसरला तरच स्वातंत्र्य , समता व बंधुत्व या तिन्ही गोष्टी एकत्र राहू शकतील असे दिसते."

        संघर्ष करताना वापरण्यात येणारा मार्ग समाजाचा आत्मसन्मान घालविणारा असता कामा नये. कारण डॉ. बाबासाहेबांच्या संघर्षाचा उद्देशच मुळी मानवी हक्क प्रस्थापित करणे व आत्मसन्मान जागृत करणे हा आहे. म्हणून सर्वांनी रमाईच्या त्यागाचा विसर पडू देऊ नका. असेही ते म्हणाले.

   


    बुद्ध विहार समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी पुष्प पूजा केल्यानंतर पूज्य भदंत सारीपुत्त यांनी बुद्ध वंदना घेऊन तथागतांच्या रूपाची प्रतिष्ठापना केली. प्रज्ञाचक्षू संगीतकार अनिल उमरे, वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे संस्थापक प्राचार्य सुरेश पाटील, दिलीप मुनेश्वर यांनी बुद्ध भीम गीते सादर केली. सत्यभामा महामुने यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती कदम यांनी आभार मानले.

   


   सम्यक सम्बुद्धाच्या रूपाचे दान केल्याबद्दल रमेश महामुने व सत्यभामा महामुने यांच्या विहार समितीच्या महिला कार्यकर्त्या व समाजसेवक खंडूजी मुनेश्वर यांनी सत्कार केला. 


नव निर्वाचीत सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. 


सकाळी पंचरंगी धम्म ध्वजारोहन झाल्यानंतर प्रमुख मार्गांनी सम्यक सम्बुद्धाच्या रूपाची मिरवणूक काढण्यात आली. प्रमुख वक्त्यांसह गझलकार मधू बावलकर यांनी विचार मांडले.  सुमित्रा अभंगे यांनी कविता सादर केली. बौद्धाचार्य प्रेमानंद कानिंदे , सोमा पाटील, एन.एस. गायकवाड, गंगाधर कदम, संरक्षण विभागाचे तालुका उपाध्यक्ष समता सैनिक दलाचे प्रमुख राहुल उमरे, राहुल घुले व विशाल येरेकर यांनी सहभाग घेतला.

   


  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोदावरी रिंगणमोडे, लक्ष्मीबाई मुनेश्वर,  केवळाबाई कानिंदे, रमाबाई भगत,सुनिता उमरे, माया कसबे, रुक्मिणीबाई गिमेकर, रूपाली मुनेश्वर, पंचशिला येरेकार, अरुणाबाई धोटे, ज्योती मुनेश्वर, कांचन घुले, अशोक कानिंदे, बौध्दाचार्य अनिल उमरे, कपिल कांबळे, सुधीर पाटील, रत्नदीप येरेकर, राहूल घुले, संविधान मुनेश्वर, प्रशांत रावळे, आनंद कानिंदे, शंकर धोटे,  संदेश घुले,  कपिल कावळे,  प्रकाश कांबळे, सावन मुनेश्वर, मारोती अभंगे, प्रीतीन कानिंदे , निळकंठ कावळे, निलेश भवरे, सुनिल भवरे, जनार्धन भगत , प्रतिक उमरे, सम्यक मुनेश्वर  आदींनी परिश्रम घेतले.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News