*भारतीय स्टेट बँक आरसेटी येथे "जागतिक योगा दिवस" उत्साहात साजरा.* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, June 22, 2022

*भारतीय स्टेट बँक आरसेटी येथे "जागतिक योगा दिवस" उत्साहात साजरा.*




नांदेड: तथागत नगर येथील  भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्थेत (RSETI) मंगळवार (ता. 21 ) रोजी "जागतिक योगा दिवस" साजरा करण्यात आला. 

     आरसेटी मध्ये आयोजित कार्यक्रमात वुशु संघटना नांदेडचे मुख्य प्रशिक्षक प्रमोद वाघमारे , पंचायत समिती नांदेडचे कौशल्य समन्वयक अतिष गायकवाड , आरसेटी संचालक  राम भलावी , फॅकल्टी आशिष राऊत , विश्वास हट्टेकर, सहाय्यक अभिजित पाथरीकर,  रुणीत अर्धपुरकर तसेच महिला टेलर प्रशिक्षणाच्या ३० प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला. 

      सर्व प्रथम योगा अभ्यासाचा सराव घेण्यात आला. तद्नंतर योगा हा प्रत्येक व्यक्तींच्या जीवनामध्ये उत्तम आरोग्याकरीता अत्यंत गुणकारी आहे , हा संदेश सर्वांना देण्याकरिता जन जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. योगाचे महत्व आणि जास्तीतजास्त लोकांनी योगाभ्यासाकडे वळावे , या उद्देशाने अनेक प्रोत्साहनपर संदेश या रॅली मध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात आले. मान्यवरांनी मानवी जीवनामध्ये योगाचे महत्व विशद करून योगा मध्ये समाविष्ट कृतींचे विश्लेषण करून त्याचे फायदे प्रशिक्षणार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता आरसेटी कर्मचारी मारोती कांबळे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News