शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, July 13, 2022

शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना!

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र शासन विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.

       मुंबई विभागात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबईत ऑरेंज अलर्ट तर पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला आहे. सदर परिसिथती विचारात घेता आपत्तीच्या पूर्वसूचनेवरून, हवामान खात्याच्या अंदाजावरून तसेच त्या त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा व त्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून आपल्या कार्यकक्षेतील / स्थानिक क्षेत्रातील शाळांना उद्या वार गुरूवार दिनांक १४ जुलै, २०२२ रोजी सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच भविष्यातही अशी परिस्थिती उद्भवल्यास उक्तप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

        शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम विभाग, मुंबई. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक)जिल्हा परिषद ठाणे/रायगड / पालघर शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी/मुख्याधिकारी, महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषद या साठी विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई संदिप संघवे यांनी परीपत्रक जाहीर केले आहे.

         पुणे जिल्ह्य़ातील पाच तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील सर्व शाळांना 14 ते 16 जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी निर्गमित केले आहेत. महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. काही जिल्हात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालकांनी कोणत्याही सरकारी आदेशाची वाट न पाहता विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आपल्या पावल्याची काळजी घ्यावी व शाळेत पाठवण्याचा किंवा न पाठवण्याचा योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील क्रीडा शिक्षक विजय अवसरमोल सरांनी व्यक्त केली आहे. शासन आपल्यापरीने जनतेच्या सुरक्षितची काळजी घेईलच परंतु एक नागरिक म्हणून प्रत्येकांनी आपली व समाजाची काळजी घेतली पाहिजे. असे मत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा अधिकारी जितेंद्र महाजन सरांनी व्यक्त केली आहे.

         महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे जातीने महाराष्ट्रातील पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत व संबंधित यंत्रणेला सज्ज राहण्याचा सल्ला दिला आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News