'बांगड्याचा आहेर व खड्यात बसून प्राणांतिक उपोषण करणार ....' या ज्येष्ठ शिवसैनिक मारोती सुंकलवाड यांच्या इशार्‍याची दखल घेऊन 'त्या' कामास झाला प्रारंभ - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, July 22, 2022

'बांगड्याचा आहेर व खड्यात बसून प्राणांतिक उपोषण करणार ....' या ज्येष्ठ शिवसैनिक मारोती सुंकलवाड यांच्या इशार्‍याची दखल घेऊन 'त्या' कामास झाला प्रारंभ



किनवट : अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर करणार... त्याच खड्यात बसून प्राणांतिक  उपोषण करणार... या  ज्येष्ठ शिवसैनिक मारोती सुंकलवाड यांनी दिलेल्या हशाऱ्याची दखल घेऊन प्रशासनाने शुक्रवारी (ता. 22 ) ठाकरे चौक गोकुंदा - दत्तनगर - मंगाबोडी जाणाऱ्या रस्त्याच्या कामास प्रारंभ केला आहे.

        जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण  समिती (दिशा), नांदेडचे सदस्य तथा ज्येष्ठ शिवसैनिक मारोती कानबाजी सुंकलवाड यांनी ता. 29 जुलै 2021 रोजी गट विकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांनी ठाकरे चौक गोकुंदा - दत्तनगर - मंगाबोडी जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाली काम व एकविरा मंदीराजवळील रस्त्यातील खड्डा बुजविण्याचे काम न केल्यास बांगड्यांचा आहेर करणार असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. 

             तसेच जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास ता. 25 मे 2022 रोजी पत्र देऊन गोकुंदा येथील स्व. बाळासाहेब ठाकरे चौक, पेटकुले नगर ते हबीब कॉलनीपर्यंतचा रस्ता 8 दिवसांच्या आत दुरुस्त न झाल्यास ता. 6 जून पासून त्याच रस्त्यावरील खड्डयात बसून प्राणांतिक उपोषण करणार असल्या बाबत कळविले होते.

         यानुषंगाने जि. प. (बांधकाम) उप विभाग  किनवटचे उप अभियंता यांनी त्यांना ता. 30 जून रोजी पत्र देऊन असे कळविले की ,सदर काम TSP 2225249 ( 27 ) TH 11000 / सन 2021-2022 अंतर्गत रामा दिगडी ते मंगाबोड़ी मांडवा रस्त्याची सुधारणा करणे इजिमा oc कि.मी. 0/00 ते 0/600 मध्ये मंजूर असून सदर रस्त्याचे बाजूला नाली बांधकामचे प्राकलन करुन कार्यकारी अभियंता जि.प. भोकर यांचेकडे तांत्रिक मान्यता व पुढील कार्यवाहीस्तव सादर करण्यात येत आहे . सदर कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त होताच सदर काम पूर्ण करण्यात येईल  करिता आपण उपोषण स्थगित करावे. तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग, किनवटचे सहाय्यक अभियंता श्रेणी-1 यांनीही ता.6 जून रोजी पत्र देऊन अशी विनंती केली की ,  ठाकरे चौक ते मगांबोडी आश्रमशाळा सदर रस्त्याच्या सुधारण्याकरीता टि.एस.पी. जिल्हा वार्षीक आदिवासी योजना प्रशासकिय मान्यता प्राप्त झाली असून सदर अंदाजपत्रक हे तांत्रीक मान्यस्तरावरती आहे. तरी सदर कामाची लवकरात लवकर निविदा लावुन सदर काम पुर्ण करण्यात येईल. करिता आपण उपोषण मागे घ्यावे.

        त्यांच्या लेखी आश्वासनाने उपोषण स्थगित केले होते. खासदार हेमंत पाटील यांनी याचा पाठपुरावा केल्याने  प्रशासनाला या आंदोलन इशारा निवेदनाची दखल घ्यावी लागली. अन् अखेर शुक्रवारी (ता.22) या कामास प्रारंभ झाला. संबंधित अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी दिशा समिती सदस्य तथा ज्येष्ठ शिवसैनिक मारोती सुंकलवाड यांना पाचारण केले. यावेळी त्यांचे समवेत युवासेनेचे प्रमोद केंद्रे होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News